अहमदाबाद: इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मालकीनीने गायक मिका सिंगच्या शोच्याआधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलेने मिकावर २७ लाखांच्या फसवणूकीचा आरोप केला आहे.
अहमदाबादच्या पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, २७ वर्षीय प्रियांका चढ्ढाने रविवारी दुपारी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रियांकाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
प्रियांकाने काही दिवसांपुर्वी नारनपुरा पोलीस स्टेशनमध्ये मिका सिंग आणि अन्य सहा जणांनी तिच्यासोबत २७ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार केली होती. तिने आरोप केला की, मिकाने अॅडव्हान्स पैसे घेतले मात्र दुसऱ्या एका शोसाठी डेट दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.