अभिनेता कादर खानच्या बंगल्याजवळ महिलेचा मृतदेह

अभिनेता कादर खान यांच्या बंगल्याजवळ महिलेचा मृतदेह आढळला आहे. तिच्याजवळ एक तान्हं बाळंही होतं, या बाळाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Updated: Aug 31, 2016, 11:01 PM IST
अभिनेता कादर खानच्या बंगल्याजवळ महिलेचा मृतदेह title=

वसई : अभिनेता कादर खान यांच्या बंगल्याजवळ महिलेचा मृतदेह आढळला आहे. तिच्याजवळ एक तान्हं बाळंही होतं, या बाळाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ज्या महिलेचा मृतदेह सापडला आहे, या महिलेचं अंदाजे वय ३० वर्ष आहे. या महिलेच्या डोक्यावर वार करून हत्या करण्यात आल्याचं संशय आहे. वसईमधील वाळीव मध्यमधील नवजीवन बंगल्याजवळ दुपारी या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.