अमाल मलिक का सोडून गेले कपिल शर्माचा शो अर्धवट?

कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वादाची चर्चा सुरू असताना, या शोमधील आणखी एक वाद समोर येत आहे.

Intern Intern | Updated: Apr 13, 2017, 06:34 PM IST
अमाल मलिक का सोडून गेले कपिल शर्माचा शो अर्धवट? title=

नवी दिल्ली : कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वादाची चर्चा सुरू असताना, या शोमधील आणखी एक वाद समोर येत आहे.

कपिल शर्माच्या वागणुकीमुळे  प्रसिद्ध गायक आणि संगीत दिगदर्शक अमाल मलिक शूटिंग अर्धवट सोडून गेल्याची माहिती समोर येत आहे.

सोनाक्षी सिन्हाचा आगामी चित्रपट 'नूर' च्या प्रमोशनसाठी अरमान आणि अमाल मलिक यांना आमंत्रित केलं होतं. परंतु शूटिंगच्या दरम्यान कपिलने अरमान मलिकला प्रेक्षकांमध्ये बसायला सांगितले. अमालना हे न आवडल्याने ते शो सोडून निघून गेले. त्यावेळी  सोनाक्षी सिन्हाही तेथे उपस्थित होती.

याविषयावर बोलताना हे सर्व खोटं असल्याचा अमाल मलिक यांचा दावा आहे. त्यावेळी काम असल्याने मी शो सोडून निघालो, असं त्यांचं म्हणणं आहे.