सैराटचा प्रोमो येणार तरी कधी?

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने वेगळा पायंडा चित्रपट सृष्टीत आणला आहे, कोणताही सिनेमा रिलीज होण्याआधी त्याचं टीझर रिलीज होतो.

Updated: Apr 18, 2016, 07:23 PM IST
सैराटचा प्रोमो येणार तरी कधी? title=

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने वेगळा पायंडा चित्रपट सृष्टीत आणला आहे, कोणताही सिनेमा रिलीज होण्याआधी त्याचं टीझर रिलीज होतो, त्यानंतर प्रोमो आणि मग गाणी, पण सैराटने वेगळी वाट धुंडाळली आहे.

सैराटने टीझर रिलीज केलं पण प्रोमो अजूनही रिलीज केलेला नाही, सिनेमा रिलीज होण्यासाठी काही दिवस राहिलेले असताना, सैराटचा प्रोमो अजूनही रिलीज झालेला नाही.

सैराटची काही गाणी मात्र यू-ट्यूबवर आली आहेत, त्यांना प्रेक्षकांचा भन्नाट प्रतिसाद लाभला आहे, व्हिडीओ स्वरूपातील सैराट झालं जी हे एकमेव गाणं पूर्णपणे यू-ट्यूबवर आहे, मात्र येड लागलं, आताच बया... ही गाणी अजूनही व्हिडीओ स्वरूपात संपूर्ण आलेली नाहीत, ऑ़डीओत ज्यूक बॉक्सच्या सहाय्याने संपूर्ण गाणी रिलीज झालेली आहेत.

प्रेक्षकांच्या गाण्यांवर उड्या पडतायत, मात्र सिनेमाची आताची गाणी पाहून ही एक रोमॅन्टीक फिल्म असल्याचं दिसतं, पण यात शेवटी प्रेमाचं काय होणार हे अजून पडद्यामागे आहे, सैराटच्या प्रोमात हे दिसेल का ?, स्टोरीची थोडीतरी कल्पना प्रेक्षकांना येईल का? हे प्रोमो रिलीज झाल्यावरच कळणार आहे.