राहुल राजनं केला आत्महत्येचा प्रयत्न

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं आत्महत्या केल्यानंतर तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगवर आरोप होत आहेत.

Updated: Apr 18, 2016, 07:10 PM IST
राहुल राजनं केला आत्महत्येचा प्रयत्न title=

मुंबई: अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं आत्महत्या केल्यानंतर तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगवर आरोप होत आहेत. पण आता राहुलनंच आत्महत्या केल्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. 

प्रत्युषाच्या मृत्यूप्रकरणी राहुलविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर प्रकृती बिघडल्यानं राहुलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. शुक्रवारी पोलिसांनी राहुलची हॉस्पिटलमध्येच चौकशी केली. 

चौकशीनंतर राहुल वॉशरुममध्ये गेला, पण बराच वेळ तो बाहेर आला नाही. हे लक्षात आल्यावर डॉक्टरांनी राहुलला दरवाजा उघडायला सांगितले. डॉक्टरांनी विनवणी केल्यानंतर अखेर राहुलनं दरवाजा उघडला. वॉशरूमच्या खिडकीतून राहुल उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.