मुंबई: वेलकमनंतर.. नाना पाटेकर, अनिल कपूर, नसिरुद्धिन शाह, डिंपल कपाडिया वेलकम बॅक या सिनेमाचा सिक्वल घेऊन आलेत. चित्रपटाचं दिग्दर्शन अनिस बाजमी यांनी केलंय.
कथानक
उदय शेट्टी, मजनू भाई, घुंगरु अशी हीट कॅरेक्टर्स घेउन वेलकम या सिनेमाचा सिक्वल वेलकम बॅक बिग स्क्रीनवर झळकलाय... उदय आणि मजनूनी आता अंडरवर्ल्डची कामं सोडलीयेत आणि आता हे दोघंही दुबईत शिफ्ट झालेय. घुंगरुला आता एक मुलगा आहे जो त्याचा नाही. त्याच्या या सावत्र मुलाचं नाव आहे अज्जु भाई जो स्वत: एक गुंड असतो. उदयची बहिण राझणा जेव्हा अज्जु भाईच्या प्रेमात पडते तेव्हा काय घडतं.. ही सगळी धमाल आपल्याला वेलकम बॅक या सिनेमात पहायला मिळते.. खरंतर या सिनेमाला काही कथाच नाही हा एक सिच्युएशनल कॉमेडी सिनेमा आहे.
आणखी वाचा - फिल्म रिव्ह्यू : लांबलचक 'हायवे'... प्रयोगांचा 'सेल्फी'
अभिनय
सिनेमाचा USP म्हणजे यातले डायलॉग्स आणि कालकारांचे टाइमिंग.. विशेष करुन अभिनेता नाना पाटेकर, अनिल कपूर, परेश रावल या तिघांनी अभिनयाची जी बॅटींग केली आहे, ती कमाल आहे.. विशेष करुन नाना पाटेकर आणि परेश रावल याच्यातले संवाद हिट आहे. याचबरोबर अनिल कपूर यांचा कॉमेडी टाइमिंगही लाजवाब आहे. विशेष करुन नाना आणि अनिल कपूरची केमिस्ट्री अफलातून वाटते.
जॉन अब्राहमनं अभिनयापेक्षा अॅक्शन आणि स्टंट्स जास्त छान केलेत हे सिनेमा पाहताना जाणवतं.
एक गोष्ट जी अगदी आवरजून सांगावीशी वाटते ती म्हणजे वेलकम बॅक हा एक कंप्लिट कॉमेडी मसाला सिनेमा आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना लॉजिकल गोष्टींच्या अपेक्षा करु नका.. फार डोकंही लावू नका नाहीतर हाती निराशाच येईल.. वेलकम बॅक या सिनेमाची मांडणी फसली आहे.. केवळ कॉमेडीच्या जोरावर सिनेमा तिकीट खिडकीवर कमाई करणार यात शंका नाही.. तेव्हा या सगळ्या गोष्टी पाहता आम्ही या सिनेमाला मी देतोय ३ स्टार्स.
आणखी वाचा - फिल्म रिव्ह्यू : 'ढोलकीचा' सस्पेन्स!
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.