मंदाना करिमीनं केलंय गुपचूप लग्न?

बिग बॉसच्या घरात असलेली ईराणी मॉडेल मंदाना करिमी दररोज कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. ललित तेहलान या तरुणानं नुकताच आपण तिचा नवरा असल्याचं म्हटलंय. त्यानं 2011मधील लग्नाचं सर्टिफिकेटही दिलंय. या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये मंदाना आणि ललितच्या लग्नाची तारीख 18 फेब्रुवारी 2011 दिसतेय. 

Updated: Oct 15, 2015, 07:41 PM IST
मंदाना करिमीनं केलंय गुपचूप लग्न? title=

मुंबई: बिग बॉसच्या घरात असलेली ईराणी मॉडेल मंदाना करिमी दररोज कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. ललित तेहलान या तरुणानं नुकताच आपण तिचा नवरा असल्याचं म्हटलंय. त्यानं 2011मधील लग्नाचं सर्टिफिकेटही दिलंय. या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये मंदाना आणि ललितच्या लग्नाची तारीख 18 फेब्रुवारी 2011 दिसतेय. 

आर्य समाजात हे लग्न झाल्याचं या नोंदणी पत्रावरून दिसतंय.

आणखी वाचा - 'बिग बॉस ९' रोशेल आणि मंदनाचा झालं भांडण, मग रडारडी...

fashionscandal.com या वेबसाइटनं दिलेल्या बातमीनुसार ललित तेहलान डिझायनर रोहित बालसोबतही संबंधीत आहे. 

2011मध्ये मंदानानं 'हो मी ललितसोबत डेटिंग करतेय, पण अजून लग्नाचं काही नाही.. ललित माझा बॉयफ्रेंड आहे पण लग्नाचा विचार आम्ही केला नाहीय', असं तिनं सांगितलं होतं. 

मॅरेज सर्टिफिकेटवर मंदानाचा फोटो दिसतोय पण नाव Manizhe करीमी असं आहे. ते तिच्या ट्विटर हँडलचंही नाव आहे.

मंदानाला अखेरीस कुणाल खेमूच्या 'भाग जॉनी'मध्ये दिसली होती. बिग बॉसमधील सर्वाधिक चर्चेत असलेली ही मॉडेल आहे. भारतीय प्रेक्षकाशी जोडलं जाण्यासाठी आपण बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मचा वापर करणार असल्याचं तिनं याआधीच स्पष्ट केलंय. 

आणखी वाचा - 'बिग बॉस' फेम मंदानाचा हा व्हिडिओ का वायरल होतोय.... ते तुम्हीच पाहा!'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.