ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना यंदाचा प्रतिष्ठित विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर झालाय. 

Updated: Oct 13, 2015, 05:01 PM IST
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर title=

सांगली: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना यंदाचा प्रतिष्ठित विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर झालाय. 

पुरस्कार निवड समितीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या ५ नोव्हेंबरला सांगलीमध्ये अभिनेत्री फैय्याज यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात येईल.  

आणखी वाचा - प्रज्ञा दया पवार यांनी राज्यशासनाचे पुरस्कार केले परत 

चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील विक्रम गोखले यांच्या योगदानाचा विचार करून त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. विष्णूदास भावे पदक आणि ११ हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यापूर्वी ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक जब्बार पटेल, नाटककार महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.