VIDEO : 'रईस'साठी 60 हजार काचेच्या बाटल्यांचा चुराडा

'रईस' सिनेमात शाहरुख खानने एका दारुचा अवैध्य धंदा करणाऱ्या माणसाची व्यक्तिरेखा साकारली आहे.

Updated: Jan 5, 2017, 08:57 AM IST
VIDEO : 'रईस'साठी 60 हजार काचेच्या बाटल्यांचा चुराडा title=

मुंबई : 'रईस' सिनेमात शाहरुख खानने एका दारुचा अवैध्य धंदा करणाऱ्या माणसाची व्यक्तिरेखा साकारली आहे.

या सिनेमातील एका दृश्यात दारुच्या बाटल्यांवरुन रोड रोलर फिरवताना दाखवण्यात आला आहे. बघण्यात जरी हे दृश्य फार सहज आणि सोपे वाटत असले तरी  या दृश्याचे चित्रिकरण करताना दिग्दर्शक राहुल ढोलकियाला फार मेहनत घ्यावी लागली होती.

या दृश्याच्या चित्रिकरणासाठी साधारणतः ६० हजार रिकाम्या बाटल्या मागवण्यात आल्या होत्या. नंतर त्यांना जमिनीवर योग्य पद्धतीने सजवण्यात आले. 

जर हे दृश्य पहिल्याच टेकमध्ये जर योग्य झाले नसते तर काय करावे लागले असते याचा विचार न केलेलाच बरा... एवढ्या बाटल्या परत मागवणे आणि त्यांना सजवणे सोपे नव्हते.

त्यामुळे दिग्दर्शक राहुल ढोलकियाने या दृश्याचे चित्रिकरण करण्याआधी कलाकारांकडून अनेकदा तालीम करुन घेतली आणि जेव्हा सगळे योग्य वाटले तेव्हाच या दृश्याचे चित्रिकरण करण्यात आले.

इथे पाहा, रईसचा ट्रेलर... 

<iframe width="640" height="360" src="https://www.youtube.com/embed/J7_1MU3gDk0" frameborder="0" allowfullscreen></iframe>