अभिनेत्री वीना मलिकचे पतीवर गंभीर आरोप

पाकिस्तानची अभिनेत्री वीना मलिक काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. पती असद खटकसोबत फारकत झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या आता वीनाने तिच्या फारकतीबाबत अनेक खुलासे केले आहेत. वीनाने एका पाकिस्तानच्या चॅनला दिलेल्या मुलाखतीत पतीवर गंभीर आरोप केले आहेत.

Updated: Mar 18, 2017, 09:23 AM IST
अभिनेत्री वीना मलिकचे पतीवर गंभीर आरोप title=

मुंबई : पाकिस्तानची अभिनेत्री वीना मलिक काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. पती असद खटकसोबत फारकत झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या आता वीनाने तिच्या फारकतीबाबत अनेक खुलासे केले आहेत. वीनाने एका पाकिस्तानच्या चॅनला दिलेल्या मुलाखतीत पतीवर गंभीर आरोप केले आहेत.

वीना मलिक मुलाखतीत ढसाढसा रडत होती. सोबतच तिच्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे बोलत होती. वीना म्हणते की, 'लोकं म्हणतात की मी पैशासाठी लग्न केलं होतं. आज असदकडे पैसे संपले आहेत म्हणून मी त्याच्यापासून फारकत घेत आहे. पण गोष्ट वेगळीच आहे.'

ट्विटरवर शोचा प्रोमो रिलीज केला गेला. काही दिवसानंतर तो शो प्रदर्शित होणार आहे. या शोमध्ये वीनाने म्हटलं की, असदने तिच्यासोबत मारहाण केली. मानसिकरित्याही तिला त्रास दिला गेला. त्यानंतर तिने फारकत घेण्याचा निर्णय घेतला असं स्पष्टीकरण वीना मलिकने दिलं आहे.