पुणे : डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा वसंतोत्सव यंदा 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान पार पडणार आहे.
या महोत्सवाची सुरवात सुप्रसिध्द गायक पंडित व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने होईल, तर त्यानंतर होणारं कृष्णाजी खाडिलकर लिखीत संगीत मानापमान नाटकांचं सादरीकरण हे यावर्षीच्या महोत्सवाचं वैशिष्ट्य असणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात सिनेगायिका रेखा भारद्वाज यांच्या गायनाने होईल, तर त्यानंतर रोणू मुजुमदार आणि शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचं एकत्रित सादरीकरण होईल.
शेवटच्या दिवशी किराणा घराण्याचे गायक आनंद भाटे यांचं गायन होईल तर महोत्सवाचा समारोप इंडियन ओशन आणि पंडित विश्वमोहन भट यांच्या फ्युजन सादरीकरणाने होईल.