'जुडवा-2मध्ये वरुण मुख्य भूमिकेत

बॉलीवूड अभिनेता वरुण धवन 'जुडवा-2' चित्रपटात दोन अभिनेत्रींबरोबर मुख्य भूमिका करणार आहे. दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला आपला सुपरहिट सिनेमा जुडवा याचा सिक्वेल बनवणार आहे.

Updated: Sep 4, 2016, 02:47 PM IST
'जुडवा-2मध्ये वरुण मुख्य भूमिकेत  title=

मुंबई: बॉलीवूड अभिनेता वरुण धवन 'जुडवा-2' चित्रपटात दोन अभिनेत्रींबरोबर मुख्य भूमिका करणार आहे. दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला आपला सुपरहिट सिनेमा जुडवा याचा सिक्वेल बनवणार आहे.

जुन्या जुडवा सिनेमात सलमान खान, करिश्मा कपूर आणि रंभा मुख्य भूमिकेत दिसले होते. आता 'जुडवा-2 मध्ये वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस आणि परिणीति चोपडा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

या सिनेमाचं दिग्दर्शन डेविड धवन करणार आहे. जॅकलिनला या सिनेमाची कल्पना आवडली असून, परिणीती सुध्दा हा सिनेमा करण्यासाठी तयार झाली आहे.या सिनेमाचं चित्रीकरण पुढील वर्षी मार्चमध्ये सुरू होणार आहे.