मुंबई : उडता पंजाब चित्रपटावरील सुनावणीत मुंबई हायकोर्टानं सेन्सॉर बोर्ड़ाला चांगलंच फैलावर घेतलं. न्यायाधिशांनी सुनावणीदरम्यान अनेक चित्रपटांची उदाहरणं देत सेन्सॉर बोर्डाला सुनावलं.
गोव्याला आजपर्यंत कित्येक चित्रपटांत वाईट पद्धतीने दाखवलंय, मग तेव्हा तुमच्या सेन्सॉर बोर्डाने का दखल घेतली नाही? आज गोवा राज्याकडे 'वाईन अँड वुमन' असं पाहिलं जातं. अनेक लोकही गोव्यात पिकनिकला जाताना असे विचार घेऊन जातात. मग अशा चित्रपटांमुळं सार्वभौमत्व, अखंडता धोक्यात येत नाही का? असा सवालही न्यायालयानं सेन्सॉर बोर्डाला खडा सवाल केला.
तसच पंजाब राज्याची आणि त्यातील लोकांची प्रतिमा चित्रपटात खालावली जाणार नाही, ड्रग्जच्या प्रकारांना ग्लोरिफाय केले जाणार नाही, प्रोत्साहन दिले जाणार नाही, याची खबरदारी आम्ही घेऊ. आमच्या काळात 'हमारे एमएलए', 'राम अवतार' असे सिनेमा होते त्यावर कोणी आक्षेप नोंदवला नाही तर आता तुम्हाला असं का वाटतं की, चित्रपटाच्या सुरुवातीला 'पंजाब' नावाचा साईनबोर्ड दाखवून किंवा इलेक्शन, पार्टी, एमपी, एमएलए अशा शब्दांनी देशाच्या अखंडतेला बाधा कशी पोहोचू शकते असा सवालही न्यायालयानं केलाय.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालायने उद्या सुनावणी ठेवलीये. उद्या न्यायालय उडतां पंजाब अणि सेन्सॉर बोर्डाच्या वादावर अंतिम निकाल देवू शकते.