बाहुबली नाही कटप्पावर जडलं ट्विंकल खन्नाचं हृदय, ट्विटरवर दिली प्रेमाची कबुली

 नुकताच अक्षय कुमार याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. जगभऱात त्याचे फॅन कमी नाही.   पण त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिचं हृदय आता दुसऱ्यावरच आलं आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 15, 2017, 08:00 PM IST
बाहुबली नाही कटप्पावर जडलं ट्विंकल खन्नाचं हृदय, ट्विटरवर दिली प्रेमाची कबुली  title=

मुंबई :  नुकताच अक्षय कुमार याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. जगभऱात त्याचे फॅन कमी नाही.   पण त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिचं हृदय आता दुसऱ्यावरच आलं आहे. 

ट्विंकल खन्ना हिला नव्याने प्रेम झाले आहे. तिने ट्विट करून आपला नवीन क्रश सांगितला आहे. यामुळे अक्षय कुमारला धक्का बसेल, ट्विंकलचे ज्या व्यक्तीवर मन जडलं त्या व्यक्तीची चर्चा आता सर्वत्र आहे. 

तर आम्ही सांगतो तो कोण आहे, ट्विंकलचे ज्या व्यक्तीवर प्रेम जडलं तो आहे बाहबली २ मधील कटप्पा... बाहुबली २ पाहून आल्यावर ती आपल्या मुलीला कटप्पा म्हणून हाक मारत आहे. ट्विंकलने ही माहिती स्वतः ट्विटरवरून आपल्या फॅन्सला दिली आहे. 

कटप्पा यांची प्रशंसा करताा ट्विंकलने ट्विटवर त्यांच्या मुलाला टॅक केले. त्यात म्हटले की सर तुम्ही शानदार आहात, आम्ही पार्ट १ आणि पार्ट २ पाहिला. जबदस्त यशासाठी खूप शुभकामना... 

या ट्विटवर सत्यराज यांचा मुलगा सिबीराज याने ट्विंकलचे आभार मानले.