न्यूड व्हिडिओ पाठविल्या प्रकरणी, 'उडाण'मधील 'बडे ठाकूर'ला अटक

कलर्स टीव्ही वरील 'उडान' या सुप्रसिद्ध मालिकेतील खलनायकाची भूमिका करणाऱ्या  अभिनेता साई विठ्ठल बल्लाळ मुंबई पोलीसांनी आयटी अॅक्टखाली अटक केलीये. उडाण मालिकेतही कथानकानुसार साई बल्लाळ याने साकारलेल्या 'बडे ठाकूर'ला अटक करण्यात  आली आहे. म्हणजे आता रिल लाइफ बरोबर रिअल लाइफमध्येही त्याला अटक करण्यात आली आहे. 

Updated: Jul 16, 2015, 05:32 PM IST
न्यूड व्हिडिओ पाठविल्या प्रकरणी, 'उडाण'मधील 'बडे ठाकूर'ला अटक title=

मुंबई : कलर्स टीव्ही वरील 'उडान' या सुप्रसिद्ध मालिकेतील खलनायकाची भूमिका करणाऱ्या  अभिनेता साई विठ्ठल बल्लाळ मुंबई पोलीसांनी आयटी अॅक्टखाली अटक केलीये. उडाण मालिकेतही कथानकानुसार साई बल्लाळ याने साकारलेल्या 'बडे ठाकूर'ला अटक करण्यात  आली आहे. म्हणजे आता रिल लाइफ बरोबर रिअल लाइफमध्येही त्याला अटक करण्यात आली आहे. 

एक महिलेवर अश्लील कमेंट केल्या बद्दल पोलीसांनी बल्लाळला अटक केलीये. मुंबई पोलीसांच्या बोरीवली पोलीसांनी ही कारवाई केली असून, कलम ३५४ A, D 506,5504,109 IPC,  67 A IT नुसार साईला अटक करण्यात आलीये. 

उडाण या मालिकेत साईने महत्त्वाची भूमिका केली आहे. तसेच इतर अनेक सिरीअलमध्ये साईने काम केलय. ज्या महिलेला साई अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवायचा ती महिला साईची सहकलाकार आहे. 

तसेच तो गेली सहा महिने त्या महिलेला हे अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठवतोय. याबाबत या महिलेने साईला ताकीद देखील दिली होती. पण साईचे कृत्य सुरुच होते. शेवटी त्या महिलेने बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार केली तेव्हा पोलीसांनी साईला गोरेगाव फिल्मसिटीतून सेटवरुन अटक केलीये.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.