तुषार कपूर काय म्हणाला पाहा सैराटबद्दल

सैराट या चित्रपटाची चर्चा बॉलीवूडमध्येही चांगलीच रंगतेय. आमिर खान, अनुराग कश्यप, सुभाष घई यांनी या चित्रपटाला पसंतीची पावती दिलीये. 

Updated: May 11, 2016, 12:35 PM IST
तुषार कपूर काय म्हणाला पाहा सैराटबद्दल title=

मुंबई : सैराट या चित्रपटाची चर्चा बॉलीवूडमध्येही चांगलीच रंगतेय. आमिर खान, अनुराग कश्यप, सुभाष घई यांनी या चित्रपटाला पसंतीची पावती दिलीये. 

तसेच हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्की पाहावा असं आवाहनही त्यांनी केलंय. यात आता तुषार कपूरनेही सैराटचे अभिनंदन केलंय. ट्विटरवर त्याने याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केलीये. 

सैराट हा चित्रपट त्याला खूप आवडलाय. सैराट खूप सुंदर आहे असं त्यानं म्हटलंय.