सलमान खानसोबत दीपिका पदुकोण झळकणार ‘ट्युबलाइट’ सिनेमात

अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच अभिनेता सलमान खानसोबत त्याच्या आगामी ‘ट्युबलाइट’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. 

Updated: Jul 28, 2016, 05:48 PM IST
सलमान खानसोबत दीपिका पदुकोण झळकणार ‘ट्युबलाइट’ सिनेमात title=

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच अभिनेता सलमान खानसोबत त्याच्या आगामी ‘ट्युबलाइट’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. 

सलमान खानच्या बहुचर्चित ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खान ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाचेही दिग्दर्शन करणार आहे. हा चित्रपट कबीरचा आतापर्यंतचा सर्वाधिक महत्त्वाकांक्षी चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.

चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खान पहिल्यांदाच लडाख येथे शूटिंग करत आहे. हॉलीवूडमध्ये पदार्पणाच्या तयारीत व्यस्त असणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खानसह एकाच चित्रपटाच दिसणार असल्याची चर्चा आहे.

 ट्युबलाइट हा चित्रपट चीन आणि भारतात झालेल्या युद्धावर आधारित आहे. तर याची कथा एक सामान्य माणूस आणि लहान चीनी मुलगी यांच्याभोवती फिरणारी आहे.