मुंबई : भाजपच्या आमदार अंगूरलता या आपल्या फोटोमुळे चर्चेत आल्या आहेत, चर्चेत येण्यामागचं खरं कारण सौंदर्य आहे, मात्र सोशल नेटवर्किंगवर सध्या जो फोटो फिरतोय.
कारण अंगूरलता नावाने व्हायरल झालेले फोटो, हे त्या महिला आमदाराचे नाहीत, तर मुंबईतील एका तरूणीचे असल्याचं सांगण्यात येत आहे.
ही तरूणी मुंबईतीत फिटनेस ट्रेनरचे आहे. या फिटनेच ट्रेनरचे नाव सपना व्यास असल्याचंही सांगण्यात येत आहे.
प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, अंगूरलता आणि सपना व्यास यांच्या चेहेरेपट्टीत कमालीचे साम्य आहे.
या गोष्टीचा फायदा घेत कुणीतरी फोटोशॉपचा वापर करून लोकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला आहे.