मुंबई : जगभरात दहशतवादी कारवायांसाठी कुप्रसिद्ध ISIS या जहाल अतिरेकी संघटनेने आता बॉलिवूडला टार्गेट केलंय. या संघटनेची भारतातील जबाबदारी ज्यांच्यावर सोपविण्यात आलेय असे दोन संशयित पकडल्यानंतर त्यांच्या तपासात ही माहिती पुढे आली आहे.
ISIS ही दहशतवादी संघटना सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे आता पैशांसाठी त्यांनी आपला मोर्चा बॉलिवूडूकडे वळवलाय. बॉलिवूडच्या कलाकारांकडून आपल्या काळ्या कारवायांसाठी खंडणी उकाळण्याचा ISISचा डाव दिसतोय.
ISISच्या या कटाला मुंबई पोलिसांनीही दुजोरा दिलाय. रिझवाननुद्दीन तथा खालीद आणि मुद्दबीर शेख हे दोघे ISISचे भारतीय प्रमुख कमांडर होते. जानेवारी महिन्यात सुरक्षा एजन्सीने संघटनेचा पर्दाफाश केला असतांना त्यावेळी रिझवानने ही कबुली दिली. पण बॉलिवूड कलाकारांपर्यंत पोहोचण्याआधीच याचा पर्दाफाश झाला, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय.