'स्टुडंट्स ऑफ दी ईयर'च्या सिक्वेलमध्ये टायगर श्रॉफ

2012मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्टुडंट्स ऑफ दी ईयर' या सिनेमाचा सिक्वेल लवकरच येणार आहे. करण जोहरच्या या सिनेमात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. 

Updated: Aug 16, 2016, 01:29 PM IST
'स्टुडंट्स ऑफ दी ईयर'च्या सिक्वेलमध्ये टायगर श्रॉफ title=

मुंबई : 2012मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्टुडंट्स ऑफ दी ईयर' या सिनेमाचा सिक्वेल लवकरच येणार आहे. करण जोहरच्या या सिनेमात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. 

या सिनेमात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असणार आहे. यापूर्वी या भूमिकेसाठी शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टरच्या नावाची चर्चा होती. मात्र ही भूमिका टायगर श्रॉफ कऱणार आहे. करण जोहरने स्वत: ट्वीट करुन याची माहिती दिलीये. 

दरम्यान, टायगर श्रॉफसोबत कोण हिरोईन असणार याबाबत निश्चिती झालेली नाहीये. यासाठी तीन नावे सध्या चर्चेत आहेत. 

अमिताभ बच्चन यांची नात नव्या, श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची मुलगी सारा खान यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी करण कोणाची निवड करतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.