मुंबई : बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे आधी नॉनव्हेज खात होते मात्र फिगर मेंटेन ठेवणे तसेच आरोग्याच्या अन्य कारणास्तव त्यांनी नॉनव्हेज खाणे सोडले. हे कलाकार व्हेज जेवणालाचा पसंती देतात.
आलिया भट्ट - निरोगी त्वचा आणि केसांसाठी आलिया व्हेज डाएट फॉलो करते.
कंगना राणावत - आपले आरोग्य तसेच त्वचेची सुंदरता कायम राखण्यासाठी कंगनाने नॉनव्हेज खाणे बंद केलेय.
अमिताभ बच्चन - व्हेज खाल्ल्यानंतर अधिक एनर्जेटिक वाटत असल्याने त्यांनी नॉनव्हेज खाणे बंद केले.
सोनाक्षी सिन्हा - वजन कमी करण्यासाठी सोनाक्षीने व्हेज डाएट सुरु केले.
अनुष्का शर्मा - अनुष्काने एका वर्षांपासून नॉनव्हेज खाणे बंद केलेय.
विद्या बालन - नॉनव्हेज खाण्याने वजन वाढते त्यामुळे विद्या बालनने नॉनव्हेज खाणे बंद केलेय.
फरहान अख्तर - आरोग्य निरोगी राखण्यासाठी फरहानची व्हेज खाण्याला पसंती असते.
जॅकलीन फर्नांडिस - पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी या अभिनेत्रीने नॉनव्हेज खाणे सोडले.