आमिरने नकार दिलेले १० चित्रपट झाले सुपरहिट

आज आमिर खानचा ५१वा वाढदिवस आहे. सध्या तो त्याच्या दंगल या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचा शेवटचा चित्रपट पीकेने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 

Updated: Mar 14, 2016, 09:29 AM IST
आमिरने नकार दिलेले १० चित्रपट झाले सुपरहिट title=

मुंबई : आज आमिर खानचा ५१वा वाढदिवस आहे. सध्या तो त्याच्या दंगल या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचा शेवटचा चित्रपट पीकेने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 

बॉलीवूडमध्ये परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला आमिर खान चित्रपटांच्या बाबतीतही परफेक्ट आहे. वर्षातून एखादाच चित्रपट करतो मात्र तो चित्रपट हिट ठरतो. मात्र तुम्ही जाणून हैराण व्हाल की आमिरने अनेक बॉलीवूडच्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या. मात्र हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. 

सलमान खानची सुपरडुपर हिट ठरलेली हम आपके है कौन या चित्रपटासाठी आमिरला आधी ऑफर आली होती. मात्र आमिरने हा चित्रपट नाकारला. त्यानंतर सलमानने या चित्रपटात काम केले. मात्र प्रदर्शनानंतर आजतायगत या चित्रपटावर प्रेक्षकांचे प्रेम कायम आहे. 

आमिरने नाकारलेल्या डर, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, दिल तो पागल है, मोहोब्बते आणि स्वदेश या पाच चित्रपटांत शाहरुखने काम केले. आणि विशेष म्हणजे हे सर्व चित्रपट गाजले. जोशमध्येही चंद्रचूड सिंहच्या भूमिकेसाठीही आमिरला विचारण्यात आले होते. मात्र विरोधी मुख्य भूमिका करण्यास आमिरने नकार दिला. साजन या चित्रपटात आमिरने काम करण्यास नकार दिल्यानंतर संजय दत्तने या चित्रपटात काम केले. १९४२ अ लव्ह स्टोरी या चित्रपटासाठीही आमिरला विचारण्यात आले होते.