सलमान खानच्या बहिणीच्या घरी चोरी

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची बहिणीच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरांनी ३ लाखांचा मुद्देमाल संपास केला आहे. अर्पिताच्या घरातून 2.25 लाख रुपयांची रोकड, 10 ग्राम सोन्याचा सिक्का आणि डिजायनिंग केलेले कपडे चोरीला गेले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी मोलकरणीला ताब्यात घेतलं आहे.

Updated: Aug 23, 2016, 04:26 PM IST
सलमान खानच्या बहिणीच्या घरी चोरी title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची बहिणीच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरांनी ३ लाखांचा मुद्देमाल संपास केला आहे. अर्पिताच्या घरातून 2.25 लाख रुपयांची रोकड, 10 ग्राम सोन्याचा सिक्का आणि डिजायनिंग केलेले कपडे चोरीला गेले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी मोलकरणीला ताब्यात घेतलं आहे.

अर्पिता तिचा पती आयुषसोबत बांद्रा येथील पेसेफिक अपार्टमेंटमध्ये राहते. अर्पिता पतीसोबत सुट्ट्यांवर गेली होती. जेव्हा अर्पिता आणि तिचा पती 21 ऑगस्टला घरी आले तेव्हा चोरीची घटना समोर आली.
अर्पिताने खार पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अर्पिताचा ड्रायव्हर आणि शेजाऱ्यांची चौकशी केली. त्यानंतर घरात काम करणाऱ्या मोलकरणीला नालासोपारा येथून ताब्यात घेतलं.

पोलिसांचं म्हणणं आहे की, मोलकरणी अफसा ही तिच्याच घरी राहत होती. पण ३० जुलैपासून ती घरातून गायब होती. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून चौकशी सुरु आहे.