गुत्थी कपिल, कपिल गुत्थी- गुत्थी अखेर परतली!

गुत्थी कपिल, कपिल गुत्थी, गुत्थी कपिल. गुत्थी आणि कपिलच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी... आता पुन्हा ही जोडी जुन्या जोशात दिसणार आहे. कारण गुत्थी आपल्या अंदाजात आणि जुन्या अड्ड्यामध्ये परतलीय. 

Updated: Jul 13, 2014, 01:34 PM IST
गुत्थी कपिल, कपिल गुत्थी- गुत्थी अखेर परतली! title=

मुंबई: गुत्थी कपिल, कपिल गुत्थी, गुत्थी कपिल. गुत्थी आणि कपिलच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी... आता पुन्हा ही जोडी जुन्या जोशात दिसणार आहे. कारण गुत्थी आपल्या अंदाजात आणि जुन्या अड्ड्यामध्ये परतलीय. 

'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' शो मध्ये गुत्थीची भूमिका करणारा अभिनेता सुनील ग्रोवर शोमध्ये परततोय. सुनील काही दिवसांपूर्वीच शो मध्ये परत आलाय. मात्र कॉन्ट्रॅक्ट संबंधित काही मुद्द्यांमुळे शूटिंग सुरू होऊ शकली नाही. 

आता सुनीलनं करार केला असून त्याच्या कम बॅकच्या एपिसोडचं शूटही झालेलं आहे. गुत्थी आता शोमध्ये कपिलचा सासरा म्हणून परत येणार आहे. कपिलच्या बायकोची भूमिका सुमोना करतेय. सुनील ग्रोव्हर पहिल्या त्याच्या पहिल्या भागात सुमोनाच्या वडिलांची भूमिका करेल. नंतर गरजेप्रमाणे कॅरेक्टर बदलेल. 

सुनीलनं याबाबत अजून स्पष्ट सांगितलं नाहीय. काही महिन्यांपूर्वी कपिलसोबत झालेल्या मतभेदांमुळे सुनीलनं कपिलाचा शो सोडला होता आणि आपला नवा शो ‘मॅड इन इंडिया’ सुरू केला होता. मात्र त्या शोला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.