कपिल आणि भारतीसोबत काम करणारी कॉमेडियन सलोनी आता अशी दिसते

स्टॅंडअप कॉमेडियन आणि बालकलाकार सलोनी डेनी छोट्या पडद्यावर 'गंगूबाई' नावाने प्रसिद्ध आहे. सर्वांना हसविणारी ही छोटी गुडीया आता कशी दिसते, याची अनेकांना उत्सुकता असेलच.

Updated: Jun 23, 2016, 02:51 PM IST
कपिल आणि भारतीसोबत काम करणारी कॉमेडियन सलोनी आता अशी दिसते title=

मुंबई : स्टॅंडअप कॉमेडियन आणि बालकलाकार सलोनी डेनी छोट्या पडद्यावर 'गंगूबाई' नावाने प्रसिद्ध आहे. सर्वांना हसविणारी ही छोटी गुडीया आता कशी दिसते, याची अनेकांना उत्सुकता असेलच.

सलोनीने साधारण तीन वर्षांपासून आपल्या करिअरला सुरुवात केली. २००९मध्ये प्रसारित होणारा कॉमेडी शो 'छोटे मियां' अधिक चर्चेत होता. या शोची ती विजेती होती. त्यानंतर अन्य टीव्ही शोमध्ये ती दिसली. तसेच 'नो प्रॉब्लम' या सिनेमातही ती चमकली.

सलोनीला दिग्दर्शक व्हायचेय. तिचा शो पाहताना ती कमी मेकअपमध्ये दिसली. तिला मेकअप चांगला दिसत नव्हता. सलोनीला घरीच राहणे जास्त आवडते. तिच्या घरी एक क्यूट कुत्रा आहे. त्याच्यासोबत ती आपला वेळ घालवते. ती सर्वसामान्य मुलीप्रमाणे शाळेत जाते. ती घरातील लहानसहान कामे करते. ती टीव्हीवर आपला शो पाहत नाही. तर ती छोटा भीम प्रमाणे कार्टून पाहणे पसंत करते.

गंगूबाई नावाने ओळखली जाणारी सलोनी अनेक प्रसिद्ध कलाकार आणि राजकीय नेते यांची हुबेहुब नक्कल करताना दिसली. तिने कॉमेडी सर्कस, चक धूम धूम, छोटे मियां आदी शोमध्ये काम केलेय. तसेच सलोनीने मराठी मालिकेतही काम केलेय. सलोनी आपल्या कामाबरोबर अभ्यासावर लक्ष केंद्रीत करते. शूटिंग संपल्यानंतर ती घरात अभ्यास करते. तिला सायन्स आवडते.