मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी हिचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा फोटो खुद्द खुशीनेच अपलोड केलाय. मात्र, हा जुना फोटो असला तरी आता तो व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी खुशीने पॉपस्टार जॅक गिलिन्स्कीच्या गालावर चुंबन देतानाचे स्वत:चा फोटो इन्स्ट्राग्रामवर अपलोड केला होता. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असल्याचे खुशीने या फोटोबरोबर मेसेजमध्ये म्हटले होते. त्यामुळे या फोटोवर अनेक प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
दरम्यान, खुशीची मोठी बहीण जान्हवी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, तशी चर्चा आहे. मध्यंतरी सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम आणि अनुराग कश्यपच्या मुलीबरोबरचे जान्हवीचा फोटो व्हायरल झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.