अभिनेत्री सोनम कपूरही 'स्वाईन फ्लू'च्या विळख्यात

स्वाईन फ्लूचा कहर भारतात वाढत चाललाय. याचाच पुरावा म्हणजेच, आज अनिल कपूरची लाडकी मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर हिचीही स्वाईन फ्लू टेस्ट पॉझिटीव्ह निघालीय. 

Updated: Feb 28, 2015, 06:47 PM IST
अभिनेत्री सोनम कपूरही 'स्वाईन फ्लू'च्या विळख्यात title=

मुंबई : स्वाईन फ्लूचा कहर भारतात वाढत चाललाय. याचाच पुरावा म्हणजेच, आज अनिल कपूरची लाडकी मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर हिचीही स्वाईन फ्लू टेस्ट पॉझिटीव्ह निघालीय. 

त्यामुळे, स्वाईन फ्लूच्या धोक्यापासून कोणत्याही थरातील व्यक्तींना सूट नाही, हेच यामुळे सिद्ध होतंय.  

सूरज बडजात्या निर्मित 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाच्या शूटींगसाठी सोनम गुजरातमध्ये राजकोटजवळच्या गोंदल भागात सलमान खानसोबत शूटींग करत होती. गेल्या 10 दिवसांपासून ती इथंच होती. 

आज सकाळीच अचानक ताप भरल्यानं सोनमला तातडीनं राजकोटच्या स्टर्लिंग हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं. त्यानंतर तिच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले... आणि तपासणीअंती सोनमला स्वाईन फ्लूच्या विळख्यात सापडल्याचं निदान डॉक्टरांनी केलंय. त्यामुळे, सोनमला मुंबईला हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. 

सोनमसोबत तिच्या फिटनेस ट्रेनरलाही स्वाईन फ्लू झाल्याचं समजतंय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.