मुंबई : सुप्रसिद्ध मॉडेल सोनाली राऊत हिने अली मिर्झा याला कानाखाली लगावल्याने ‘बिग बॉस ८’मधील नौटंकीला चांगली फोडणी मिळाली आहे. अली मिर्झाच्या कानाखाली पडल्याने बिग बॉसच्या घरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
कॉन्ट्रोव्हर्शियल शो ‘बिग बॉस’मध्ये ही लगावली कानाखाली एक शॉकिंग क्षण आहे. पण अजून समजले नाही की सोनालीने अलीला कानाखाली का लगावली.
'BollywoodLife.com' मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार अली आणि पुनित यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यावेळी दोघांनी एकमेकांचे सिक्रेट उघड करण्याची धमकी दिली होती. तेव्हापासूनच हा वाद सुरू झाला.
या धमकीनंतर पुनितने सर्व हाऊसमेट्सला बेडरूमध्ये एकत्र बोलावलं आणि लिजा हेडन रूममध्ये दाखल झाल्यावर काय कमेंट केली होती, ते पुन्हा अलीला बोलायला लावले.
पुनितच्या या गोष्टीने सोनाली थक्क झाली. आणि तिच्या मागे अली काय बोलतो हे तिला समजले, त्याच्यानंतर सोनालीने अलीच्या सणसणीत कानाखाली लगावली.
यानंतर अलीने तक्रार केली आणि त्याला शारीरिक हिंसाला सामोरे जावे लागले आहे. बिग बॉसमध्ये शारीरिक हिंसा बिल्कुल अमान्य आहे.
अलीने धमकी दिली की सोनालीविरोधात कारवाई झाली नाही तर ‘बिग बॉस’ सोडून देईल. पण घरातील सर्व सदस्य हे अलीच्या विरोधात आहेत.
इतकेच नाही तर अली घराच्या छतावर जाऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. बिग बॉसने त्याला रोखले त्यानंतर अली कन्फेशन रूममध्ये गेला.
त्यानंतर सर्व घर अलीच्या विरोधात गेले आणि कन्फेशन रूममध्ये अली फ्लोअरवर झोपून गेला. यावेळी डॉक्टरांनना बोलावलं लागलं. हा संपूर्ण घटनेनंतर त्याला शिफ्ट करण्यात आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.