स्मृती इराणी यांचा अभिनय आता दुर्मिळ

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आता अभिनेत्री म्हणून पडद्यावर दिसणं तसं दुर्मिळ होणार आहे. कारण मागील सहा महिन्यापासून मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर स्मृती इराणी व्यस्त झाल्या आहेत.

Updated: Dec 15, 2014, 09:58 PM IST
स्मृती इराणी यांचा अभिनय आता दुर्मिळ title=

मुंबई : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आता अभिनेत्री म्हणून पडद्यावर दिसणं तसं दुर्मिळ होणार आहे. कारण मागील सहा महिन्यापासून मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर स्मृती इराणी व्यस्त झाल्या आहेत.

'ऑल इज वेल' या आगामी चित्रपटात इराणी यांच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला संधी देण्याचा निर्णय टी-सिरीजने घेतला आहे. 

अभिषेक बच्चन यांच्या आईची भूमिका साकारण्यासाठी स्मृती इराणी यांची निवड करण्यात आली होती.  नव्या अभिनेत्रीसह या चित्रपटाचे चित्रीकरण जानेवारीमध्ये पुन्हा करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.