डॉक्टरला मारहाण प्रकरणी गायक मिका सिंहला अटक नंतर जामीन

डॉक्टरला मारहाण केल्याच्या आरोपात गायक मिका सिंहला अटक करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांनी मिका सिंहला अटक केली. अटकेनंतर त्याला दिल्लीतील इंद्रपूरी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. इथं मिका सिंहची चौकशी सुरू आहे. मिका सिंह प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीचा भाऊ आहे.

Updated: Jun 11, 2015, 04:48 PM IST
डॉक्टरला मारहाण प्रकरणी गायक मिका सिंहला अटक नंतर जामीन title=

नवी दिल्ली: डॉक्टरला मारहाण केल्याच्या आरोपात गायक मिका सिंहला अटक करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांनी मिका सिंहला अटक केली. अटकेनंतर त्याला दिल्लीतील इंद्रपूरी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. इथं मिका सिंहची चौकशी सुरू आहे. मिका सिंह प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीचा भाऊ आहे.

यावर्षी एका लाइव्ह शो दरम्यान मिका सिंहनं एका डॉक्टरला मारहाण केली होती. डॉक्टर महिलांकडे बघून अश्लिल हावभाव करत होता आणि तो दारूच्या नशेत असल्याचं मिका सिंहनं सांगितलं होतं. डॉक्टरनं या प्रकरणी मिका विरुद्ध तक्रार नोंदवली होती. मिकावर कलम ३२३, ३२६ आणि ३२७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय.

दिल्ली पोलिसांनी अटकेपूर्वी मिका सिंहला नोटीस बजावली होती. दरम्यान, मिका सिंहला जामीन मिळालाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.