दारुच्या नशेत विवाहित करणनं काम्याकडे केली 'पॅच अप'ची मागणी!

छोट्या पडद्यावरचा अभिनेता करण पटेल आणि बिग बॉसमध्ये दिसलेली अभिनेत्री काम्या पंजाबी यांचा ब्रेक अप होऊन आता अनेक दिवस झालेत. त्यानंतर दोघांनीही आपल्या आयुष्यात पुढे वाटचाल सुरु तर केली खरी... पण, नुकतंच मात्र करणनं दारुच्या नशेत आपल्या मनातील चलबिचल जगजाहीर केलीय.

Updated: Dec 19, 2015, 04:52 PM IST
दारुच्या नशेत विवाहित करणनं काम्याकडे केली 'पॅच अप'ची मागणी! title=

मुंबई : छोट्या पडद्यावरचा अभिनेता करण पटेल आणि बिग बॉसमध्ये दिसलेली अभिनेत्री काम्या पंजाबी यांचा ब्रेक अप होऊन आता अनेक दिवस झालेत. त्यानंतर दोघांनीही आपल्या आयुष्यात पुढे वाटचाल सुरु तर केली खरी... पण, नुकतंच मात्र करणनं दारुच्या नशेत आपल्या मनातील चलबिचल जगजाहीर केलीय.

करण आणि काम्याचा ब्रेक अप त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. या ब्रेकअपनंतर करणनं आपल्या आई-वडिलांनी सुचवलेल्या मुलीशी म्हणजेच अभिनेत्री अंकिताशी लग्नही केलं. परंतु, करणनं दारुच्या नशेत आपल्या या नव्या नात्याचाही अपमान केलाय.

एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, 'बॉक्स क्रिकेट लिग'च्या जयपूर राज जोशीले टीमची मालक असलेल्या काम्यानं नुकतंच एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये करणनं आमंत्रणाशिवाय धडक दिली... तीही नशेतच...

इतकंच नाही तर करणनं दारुच्या नशेतच आपली एक्स-गर्लफ्रेंड काम्याला 'पॅचअप' करण्याची गळ घातली.

यावर, करणची पत्नी अंकिताची काय प्रतिक्रिया होती, हे मात्र कळू शकलेलं नाही.