भाजप-शिवसेना युतीवर चपखल बसतोय सैराटचा डायलॉग?

सैराट सिनेमाने राजकीय कार्यकर्त्यांनाही याड लावलं आहे, राज्यात  शिवसेना-भाजप युतीत काहीसं बिनसल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

Updated: Jun 23, 2016, 02:42 PM IST
भाजप-शिवसेना युतीवर चपखल बसतोय सैराटचा डायलॉग? title=

मुंबई : सैराट सिनेमाने राजकीय कार्यकर्त्यांनाही याड लावलं आहे, राज्यात  शिवसेना-भाजप युतीत काहीसं बिनसल्याचं चित्र निर्माण झालं आहे, यावरून कार्यकर्त्यांनी हे राजकीय चित्र सैराटच्या माध्यमातून रंगवण्यास सुरूवात केली आहे.

व्हॉटसअॅपवर शिवसेनेला आर्ची आणि परश्याला भाजप म्हणून, सैराटमधील खो-खो डाय़लॉग लिहिलाय, राजकीय भाषेत लिहिलेला हा डायलॉग, व्हॉटस अॅपवर व्हायरल होतोय आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चपखल बसतोय का ते तुम्हीच पाहा?

वाचा, सैराट आणि युती

शिवसेना : काय बघतो रं

भाजप : कुठे काय? शासन बघतोय

शिवसेना : शासन? मगास पासून डॉळॅ वासुन बघतोय की माझ्याकडं

भाजपा : तुला कसं कळलं तुझ्याकडे बघतोय ते..

शिवसेना : मी माझ्या डोळ्यांनी पायलं..

भाजपा : तूच कशाला बगती मग, तूच नको बगू की...

शिवसेना : मी बगिन नाय तर काय पन करीन...

भाजप : मग मी पन बगिन नाय त काय पैन करीन.. तुला नसल आवडत तर तू नको बगू की.

शिवसेना : मी कुटे म्हटलं माल्नाय आवडत.. (मुझिक ढॅ ढॅ ढॅ....)

भाजपा : :)

(मागून राष्ट्रवादी : अरे भाजपा लेका, तुला कळलं का लगा ती काय बोल्ली, अरे ती जे बोल्ली ते म्हणजे तिला युती पायजे लेका.)