शिल्पा शेट्टी करणार दुसरं लग्न?

आपल्या लटक्या-झटक्यांनी सर्वांचं मन जिंकणारी शिल्पा शेट्टी सध्या टेंशनमध्ये आलीय. तिच्या एका फॅनमुळं ती खूपच वैतागलीय. या फॅननं शिल्पाला लग्नासाठी मागणी घातलीय. लग्न झालेल्या एका मुलाची आई असणाऱ्या शिल्पाला त्यानं खूप त्रास दिलाय.

Updated: Dec 19, 2014, 07:51 AM IST
शिल्पा शेट्टी करणार दुसरं लग्न? title=

मुंबई : आपल्या लटक्या-झटक्यांनी सर्वांचं मन जिंकणारी शिल्पा शेट्टी सध्या टेंशनमध्ये आलीय. तिच्या एका फॅनमुळं ती खूपच वैतागलीय. या फॅननं शिल्पाला लग्नासाठी मागणी घातलीय. लग्न झालेल्या एका मुलाची आई असणाऱ्या शिल्पाला त्यानं खूप त्रास दिलाय.

हल्लीच या माथेफिरूनं शिल्पाच्या घराबाहेर गोंधळ घातला होता. शिल्पाला भेटण्यासाठी तो धडपडत होता. सिक्युरिटी गार्डनं जेव्हा त्याला हकलवण्याचा प्रयत्न केला तो जोरजोरात ओरडू लागला. त्यानंतर त्याला शिल्पाला भेटवण्यात आलं. त्याचं म्हणणं आहे की तो शिल्पावर खूप प्रेम करतो आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचं आहे.

शिल्पाच्या प्रेमात वेडा झालेला हा तिचा फॅन गेल्या दोन महिन्यांपासून तिला रोमँटिक बुक्स पाठवत असतो. तो तिला असं देखील सांगतो की, तोच तिचा सगळ्यात मोठा फॅन आहे. या माथेफिरूच्या अशा विचित्र वागण्यानं शिल्पाला घरातून बाहेर पडणंही कठीण झालंय.

खरंतर प्रत्येक कलाकारासाठी त्याच्या फॅन्सचं प्रेम हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असतं, परंतु कधी कधी अशा फॅन्समुळं त्यांच्यावर डोकं फिरण्याची वेळच येते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.