शाहरुख-ऐश्वर्या दिसणार एकत्र

शाहरुख खान आणि ऐश्वर्या रॉय हे दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

Updated: Dec 2, 2014, 05:19 PM IST
शाहरुख-ऐश्वर्या दिसणार एकत्र title=

मुबंई : शाहरुख खान आणि ऐश्वर्या रॉय हे दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
 
१९५८ ला रिलीज झालेल्या किशोर कुमार आणि मधुबाला यांचा ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटाचा रिमेक बनविण्याचा निर्णय रोहितने घेतला आहे.

शाहरुख आणि ऐश्वर्या यांनी यापूर्वी ‘देवदास’ या चित्रपटात एकत्र दिसले होते.

या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी रोहितने प्रथम काजोलला ऑफर दिली; परंतु काही कारणामुळे काजोलने चित्रपट नाकारला. त्यामुळे ऐश्वर्याला संधी देण्यात आली.

खूप काळानंतर ऐश्वर्याने चित्रपटात पुनरागमन केले आहे. ‘जज्बा’ हा चित्रपट तिने साईन केला असून, त्यात इरफान खानसोबत ती दिसणार आहे.

किशोर अणि मधुबाला यांचा ‘चलती का नाम गाडी’ हा चित्रपट हिट झाला होता. शाहरुख आणि ऐश्वर्या हे त्यांची रिमेक करतात काय, हे पाहणे मजेदार ठरेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.