शाहरूखला नाही आवडणार अबरामचं बॉलिवूडमध्ये येणं!

किंग खान शाहरुख पुन्हा आपल्या मुलाला घेऊन खूप भावूक झालाय. त्याचा धाकटा मुलगा अबराम बॉलिवूडमध्ये येणार नाही, असं शाहरुख म्हणाला. 

Updated: Sep 1, 2014, 09:33 PM IST
शाहरूखला नाही आवडणार अबरामचं बॉलिवूडमध्ये येणं! title=

मुंबई: किंग खान शाहरुख पुन्हा आपल्या मुलाला घेऊन खूप भावूक झालाय. त्याचा धाकटा मुलगा अबराम बॉलिवूडमध्ये येणार नाही, असं शाहरुख म्हणाला. 
शाहरुख आणि गौरी खानच्या कुटुंबात अबरामचा मागील वर्षी मेमध्ये जन्म झाला होता. शाहरुखला त्याच्या मुलाबद्दल मनमोकळेपणानं बोलायला आवडत नाही. याचं कारण तो माझा मुलगा आहे. दुसऱ्याचा नाही जर मी तुम्हाला माझ्या घरी येण्याची परवानगी दिली तर तुम्ही येऊ शकता, त्याला भेटायला.
48 वर्षीय शाहरुख म्हणतो, माझा जन्म मनोरंजनासाठी झालाय. पण माझ्या मुलाचा नाही. अबरामचा जन्म 34व्या आठवड्यातच झाल्यानं त्याचा अधिक काळ हॉस्पिटलमध्ये गेला. त्यामुळं अबरामबद्दल शाहरुख जास्तच भावूक आहे.

 शाहरुख पुढं म्हणाला, त्याचा मोठा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहाना मीडियासमोर येतात ते आता मोठे झाले आहेत. अबराम अजून लहान आहे. त्याला या चमचमत्या दुनियेतून दूर ठेवणार आहे. 
लिंग चाचणीसारखी चूक मी करणार नाही

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अबरामच्या जन्माअगोदर त्याच्या लिंग चाचणीबद्दल आलेली माहिती चुकीची होती. मी लिंग चाचणी करवली नाही, असं स्पष्ट मत शाहरुखनं मांडलंय.  
अबराम खूप सुंदर आहे. मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजतो. मला त्याच्यासोबत खूप मजा येते आणि माझ्या दोन मुलांनाही आपला भाऊ खूप आवडतो. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.