या कारणाने मीरा आणि शाहिद कपूरचा होऊ शकतो घटस्फोट!

 अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा यांना मस्तीच्या मूडमध्ये आणि रोमांटिक अंदाजात तुम्ही अनेकवेळा पाहिले आहे. काही दिवसापूर्वी ते कॉफी विद करणमध्ये दिसून आहे. यात त्यांनी अनेक गुपीतं उघड केली. शाहीद कपूर आणि मीराने आपल्या 'एक्स' बद्दल उघडपणे यावेळी बोलले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 2, 2017, 03:50 PM IST
 या कारणाने मीरा आणि शाहिद कपूरचा होऊ शकतो घटस्फोट! title=

मुंबई :  अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा यांना मस्तीच्या मूडमध्ये आणि रोमांटिक अंदाजात तुम्ही अनेकवेळा पाहिले आहे. काही दिवसापूर्वी ते कॉफी विद करणमध्ये दिसून आहे. यात त्यांनी अनेक गुपीतं उघड केली. शाहीद कपूर आणि मीराने आपल्या 'एक्स' बद्दल उघडपणे यावेळी बोलले. 

एक्स पार्टनर्सबद्दल बोलले शाहिद-मीरा 

शाहिदने म्हटले मी माझ्या काही एक्स गर्लफ्रेंडसला लग्नाला बोलावले होते. पण त्यातील कोणीही आल्या नाहीत.. मीराच्या एक्स बॉयफ्रेंड्सबदद्ल शाहिद म्हणाला की जेव्हा मी मीराच्या मित्रांशी बोलतो तेव्हा त्यांच्याबद्दल काही ना काही माहिती होतं. 

वयाच्या गॅपबद्दल अनेकवेळा उल्लेख 

शाहीदने आपल्या आणि मीराच्या वयाच्या अंतराबद्दल शोमध्ये अनेकवेळा उल्लेख केला.  शाहिद म्हणाला मीराला तिच्या पेक्षा १० वर्ष कमी असलेल्या छोट्या मुलांवर क्रश होतो तेव्हा जेलसी होते. जेव्हा रॅपीड फायर राउंडमध्ये करणने मीराला रणवीर सिंग, रणबीर कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्राबद्ल किल, मॅरी आणि हुकअपचे ऑप्शन दिले तर शाहिदने म्हटले गो बेबी तुझ्याच वयाचे आहेत ते....

हे असेल घटस्फोटाचे कारण 

रॅपीड फायर राउंडमध्ये करणने मीराला विचारले, तुमच्या घटस्फोट झाला तर त्याचे कारण काय असू शकले. तेव्हा मीराने मोठ्या कॉन्फिडन्सने सांगितले. माझे सासरचे आमच्यामध्ये कधीच लुडबूड करत नाही. आम्ही बोअर झालेलो नाही, आमच्यात चांगला सेक्स होतो. पण शाहिदने मला धोका दिला तर हे आमच्या घटस्फोटाचे कारण असू शकेल.