'बाहुबली 2' चित्रपटाचं दुसरं पोस्टर लाँच

'बाहुबली 2' या आगामी चित्रपटाचं दुसरं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. बाहुबली 2 चित्रपटाच्या अधिकृत अकाउंटवरुन हा फोटो ट्विट करण्यात आलाय.

Intern - | Updated: Mar 27, 2017, 06:50 PM IST
'बाहुबली 2' चित्रपटाचं दुसरं पोस्टर लाँच  title=

मुंबई :'बाहुबली 2' या आगामी चित्रपटाचं दुसरं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. बाहुबली 2 चित्रपटाच्या अधिकृत अकाउंटवरुन हा फोटो ट्विट करण्यात आलाय.

या पोस्टरमध्ये प्रभास युध्दाच्या तयारीत असल्याचं दिसतोय. त्याने तसे कपडे परिधान केले आहेत. आता खरी कथा काय आहे, हे पाहायला तर आपल्या थिएटर्समध्येच जावं लागणार.

येत्या २८ एप्रिलला बाहुबली चित्रपटाचा हा दुसरा भाग रिलीज होतोय आणि तेव्हाच गेले कित्येक दिवस छळणाऱ्या 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं' या  प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. 

बाहुबली २च्या आधी त्याचा पहिला भाग चित्रपटगृहांत दाखवला जाणार आहे. जेणेकरुन ज्यांनी तो पाहिला नाहीये, त्यांना तो बघता येईल.  मात्र अजूनही त्याची तारीख सांगितलेली नाही. 

चित्रपटात प्रभास, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटीया, राणा दुगुबट्टी हे कलाकार काम करत आहेत.यूट्यूबवरही या चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या प्रमाणात पाहिला गेलाय.