वर्षाच्या आतच सलमानची बहिण घटस्फोटाच्या उंबरठ्यावर?

सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिरा आणि तिचा पती अभिनेता पुलकीत सम्राट हे घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचं समजतंय. 

Updated: Oct 31, 2015, 09:52 PM IST
वर्षाच्या आतच सलमानची बहिण घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? title=

मुंबई : सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिरा आणि तिचा पती अभिनेता पुलकीत सम्राट हे घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचं समजतंय. 

श्वेता आणि पुलकीतच्या वैवाहिक जीवनात अनेक वादळं उभी दिसतायत. त्यांच्या भांडणांना त्यांचे शेजारीदेखील आता कंटाळलेत.

pulkit.jpg
श्वेता आणि पुलकीत

मैत्री... प्रेम... आणि लग्न असा प्रवास केलेलं हे जोडपं आता घटस्फोटावर येऊन थांबलंय. खुद्द सलमान खाननं आपल्या या मानलेल्या बहिणीचं कन्यादान केलं होतं. इतकंच नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबासह सलमान या लग्नासाठी हजर झाला होता. 

श्वेता आणि पुलकीत यांचा ३ नोव्हेंबर २०१४ रोजी गोव्यात लग्न पार पडलं होतं. त्यांच्या या लग्नाला सलमानसहित अरबाज आणि अतुल अग्निहोत्रीही उपस्थित होते. 

श्वेता मुंबईत राहणाऱ्या सिंधी परिवाराशी संबंधित आहे. एक दिवस अचानक ती सलमानच्या घरी त्याला राखी बांधण्यासाठी दाखल झाली... आणि झालंही असंच... सलमाननं तिच्या राखीचा मान राखला.

तर पुलकीतनं 'क्योंकी सास भी कभी बहू थी' कार्यक्रमातून अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश केला होता. तो फुकरे, ओ तेरी आणि बंगिस्तान या सिनेमांतूनही दिसला होता. श्वेता आणि पुलकीतची भेट स्टार प्लसच्या एका कार्यक्रमा दरम्यान झाली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.