मुंबई : सलमान खान आणि सनी लिओनी हे गुगलवर सर्वाधिक सर्च होणारे बॉलीवूड सेलिब्रिटी आहेत. गुगलनंच मागच्या दहा वर्षांमध्ये सर्वात जास्त सर्च झालेल्या सेलिब्रिटींच्या नावाची यादी जाहीर केली आहे.
या यादीमध्ये अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, चित्रपट, गायक, संगीतकार यांचा समावेश आहे. 2006 ते 2016 मधली ही आकडेवारी गुगलनं दिली आहे.
या यादीमध्ये हनी सिंग सर्वात जास्त सर्च झालेला गायक, प्रभुदेवा सर्वाधिक सर्च झालेला दिग्दर्शक, अमिताभ बच्चन आणि रेखा सर्वाधिक सर्च झालेले क्लासिकल अभिनेते अभिनेत्री आहेत. मोबाईलवरून सर्च करणाऱ्या दहापैकी एक जण हा भारतीय सिनेमाविषयी सर्च करत असतो असंही गुगलनं म्हंटलं आहे.