'सुल्तान'मधून सलमानची 100 कोटींची कमाई ?

सुल्तान रिलीज होण्याआधीच सुल्तान सिनेमावर खर्च झालेला पैसा वसूल झाला आहे. सिनेमावर 55 कोटी रुपये खर्च झाले आहेत आणइ प्रमोशनसाठी 25 कोटी खर्च केले गेले आहेत. त्यामुळे सुल्तान सिनेमावर एकूण 80 कोटी रुपये खर्च झाले आहेत. 

Updated: Jul 6, 2016, 05:32 PM IST
'सुल्तान'मधून सलमानची 100 कोटींची कमाई ? title=

मुंबई : सुल्तान रिलीज होण्याआधीच सुल्तान सिनेमावर खर्च झालेला पैसा वसूल झाला आहे. सिनेमावर 55 कोटी रुपये खर्च झाले आहेत आणइ प्रमोशनसाठी 25 कोटी खर्च केले गेले आहेत. त्यामुळे सुल्तान सिनेमावर एकूण 80 कोटी रुपये खर्च झाले आहेत. 

सिनेमाचे सॅटेलाईट राईट्स 60 कोटी आणि म्युजिक राइट्स 15 कोटीला विकले गेले आहेत. त्यामुऴे सिनेमावर खर्च झालेल्या 80 कोटीपैकी 75 कोटी वसूल झाले आहेत.

सिनेमात काम करण्यासाठी सलमानने कोणतीही फी घेतली नाही. एकूण कमाईचे 50 टक्के रक्कम तो घेतो आणि 50 टक्के रक्कम यश राज फिल्म्सला मिळेल. सिनेमा देशात जवळपास 300 कोटींची कमाई करेल असं म्हटलं जातंय. ज्यामध्ये 150 कोटींची फायदा होईल. असं झाल्यास 75 कोटी सलमानला आणि 75 कोटी यश राज फिल्म्सला मिळेल.
 
विदेशात 100 कोटींचा आकडा सिनेमा गाठेल. यामध्ये 25 कोटी सलमानचे आणि 25 यश राज फिल्म्सचे असतील. अशा प्रकारे सलमानच्या खात्यात एकूण 100 कोटी रुपयांचा नफा जमा होणार आहे. कमाईचा आकडा आणखी देखील वाढू शकतो.