मुंबई : पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट । ही ओवी तुकारामाच्या अभंगातील आहे. सैराट हा शब्द तुकारामांच्या अभंगात वापरण्यात आला आहे. सैराट सिनेमाने अनेक मागचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत, सैराटची राज्यभर चर्चा सुरू आहे.
अनेकांना सैराट म्हणजे काय असा प्रश्न सुरूवातीला पडतो, त्यावर ते सैराट शब्दाचा अर्थ देखील शोधतात. सैराट शब्दाचा अर्थ आताच नाही तर, अगदी तुकारामांच्या अभंगातही सैराट शब्द वापरण्यात आला आहे. संत तुकोबांच्या अभंगातही 'सैराट' शब्द तुकारामांनी वापरला आहे.