तुफान गर्दी खेचणाऱ्या 'सैराट' सिनेमाचे तिकीट न मिळण्याचं खरं कारण?

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत करुन दाखवलं. तुफान गर्दी खेचणाऱ्या 'सैराट' या सिनेमाचे तिकीट न मिळण्याचं खरं काय असेल? तुम्हाला माहीत आहे का? तिकीट खिडकीवर या सिनेमाचे तिकीट खरेदी करायला गेले तर मिळत नाही. 

Updated: May 7, 2016, 12:44 PM IST
तुफान गर्दी खेचणाऱ्या 'सैराट' सिनेमाचे तिकीट न मिळण्याचं खरं कारण? title=

मुंबई : नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत करुन दाखवलं. तुफान गर्दी खेचणाऱ्या 'सैराट' या सिनेमाचे तिकीट न मिळण्याचं खरं काय असेल? तुम्हाला माहीत आहे का? तिकीट खिडकीवर या सिनेमाचे तिकीट खरेदी करायला गेले तर मिळत नाही. 

काहींही आधीच बुकींग केलेय!

राज्यातील अनेक चित्रपटगृहात प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी आपापली तिकीटे बुक करुन ठेवली आहेत. त्यामुळे ऐनवेळी ज्यांनी तिकीटे बुक केली नाहीत त्यांची मात्र निराशा झालेली पाहायला मिळत आहे. तिकीट विन्डोवर तिकीटेच मिळणाशी झाली आहेत.

गाण्याची झिंग प्रेक्षकांवर

झिंग झिंग झिंगाट, याड लागलं, सैराट झालं या गाण्यांनी तर तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. आर्ची आणि परश्याचा अभिनय अफलातून झालाय. तसेच प्रेम कहाणीवर हा सिनेमा असल्यामुळे तो पाहाण्यासाठी मोठ्या गर्दी होतेय.

ऑनलाईनवर जास्त भर

सैराट सिनेमाच्या तिकीट विक्रीबाबत मिळालेल्या माहितीनुसार ८० टक्के बुकिंग ऑनलाईन पद्धतीने होत आहे किंवा करण्यात येत आहे. तर केवळ २० टक्केच तिकिटे हे सिनेमागृहातील तिकीट खिडकीच्या मार्फत मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला थोडासा उशिर झाला तर तिकीटे हातोहात संपतात. सध्या वाढता प्रतिसाद बघता आणखी शो वाढविण्यात आले असले तरी ऑनलाईन तिकीट खरेदीतही वाढ झालेली दिसून येत आहे.

एकदाच बघा सिनेमा?

सैराट सिनेमाचे अनेकांना तिकीट मिळत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ज्यांनी हा सिनेमा आधी पाहिला असेल त्यांनी पुन्हा सिनेमा पाहू नये, असे तिकीट न मिळाले प्रक्षेक आवाहन करताना दिसत आहेत. काहींही तर फेसबुक सोशल मीडियावर तशा पोस्टही केल्या आहेत. आम्हालाही सिनेमा पाहण्याची संधी मिळू दे. मात्र, ऑनलाईन तिकीट विक्री जास्त होत आहे. त्यामुळे ऑनलाईन सिनेमा तिकिटांचे बुकींग केले तर तुम्हालाही या सिनेमाचे तिकीट मिळेल.