नवी दिल्ली : 'बिग बॉस'च्या नवव्या सीझनमध्येदेखील एक वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे... ही एन्ट्री एकदम धडाकेदार असेल यात शंका नाही... कारण ही एन्ट्री आहे 'एस्क्युज मी' फेम अभिनेता साहिल खान...
तुम्हाला या सिनेमानंतर साहिलला कुठे पाहिलेलं आठवत नसेल तर थांबा... कारण, नुकताच काही दिवसांपूर्वी साहिल चर्चेत आला होता तो अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफ हिच्याबरोबरच्या संबंधांच्या चर्चेमुळे...
आयशा आणि साहिलनं एकत्र येऊन एक प्रोडक्शन हाऊस सुरू केलं होतं. परंतु, दोघांमध्ये पैशांवरून काही वाद झाले. आयशानं साहिलवर आठ करोडोंच्या घोटाळ्याचा आरोप केला. यावेळी, साहिलनं आयशा आणि आपणं दीर्घकाळापासून रिलेशनशीपमध्ये असल्याचं उघड केलं.
चैनीचं जीवन जगणाऱ्या आयेशासोबत आपण सुट्ट्यांवर केलेला खर्च, भाडे, महागड्या गाड्या यावर केलेला खर्च ती आपल्याकडून वसूल करतेय असंही साहिलनं म्हटलं होतं.
यावर, आयशानं वेगळाच दावा केला... तिनं साहिल 'गे' असल्याचं जाहीर केल. याच कारणामुळे त्याच्या पत्नीनंही त्याला घटस्फोट दिला होता... मग, गे साहिलशी आपले संबंध कसे असू शकतात, असा प्रश्न विचारत तिनं या चर्चेला वेगळंच वळण दिलं.
एक्सक्युज मी, ये है जिंदगी, डबल क्रॉस अशा सिनेमांत साहिल अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.