मुंबई : मस्तीजादे या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये त्याच्या नावाच उपयोग केल्याने रितेश देशमुख चांगलाच रागावला आहे. त्याने ट्विट करुन याबाबतची नाराजी व्यक्त केली आहे.
रितेशने ट्विट केलं आहे की, 'माझासाठी हे धक्कादायक आहे की मस्तीजादे या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये माझ्या नावाचा उपयोग केला जातोय हे कराराच्या विरोधात आहे.'
मस्तीजादे या सिनेमामध्ये सनी लिओनी, तुषार कपूर आणि वीर दास हे मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमामध्ये रितेशचेही काही रोल आहेत. पण ट्रेलरमध्ये तो मुख्य कलाकाराच्या भूमिकेत दाखवला आहे.