मुंबई : सध्या महाराष्ट्रात फक्त एकच वादळ आहे ते म्हणजे सैराट सिनेमाचं. दणक्यात ओपनिंग करणाऱ्या सैराटने अनेक रेकॉर्ड करत एक नवी उंची गाठली आहे. सैराटमध्ये अभिनयाने अनेकांचे मन जिंकणाऱ्या रिंकू राजगुरुवर कौतूकांचा वर्षाव होतो आहे.
'सैराट' सिनेमातून प्रसिद्धीस आलेल्या रिंकूला पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी रिंकूचे वडील महादेव राजगुरु आणि आई आशा राजगुरु देखील दिल्लीला तिच्यासोबत गेले होते. राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर रिंकू जेव्हा तिच्या आई-वडिलांकडे गेली तर त्यांच्या डोळ्यात पाणी होतं.
पुरस्कार स्विकारून आल्यानंतर जेव्हा रिंकूने विचारलं की, 'आई तूला काय झालं रडायला ? तेव्हा रिंकूची आई बोलली की, 'तू लहानपणी मला खूप त्रास द्यायची. पण त्रास देणारी मुलेच पुढे आई-वडीलांचे नाव मोठे करतात आणि आजचा तो क्षण आम्ही पाहत आहोत म्हणून आपोआप डोळ्यातून पाणी येत आहे.'
@rinku_rajguru received special mention award for @SairatMovie by #PresidentMukherjee. #NationalFilmAwards function pic.twitter.com/I5pjmZ2X5O
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) May 3, 2016