'हैदर' सिनेमा का पाहावा?

Updated: Sep 30, 2014, 08:05 AM IST
'हैदर' सिनेमा का पाहावा? title=

मुंबई : 'कमीने' या सिनेमानंतर  विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूर ही हिट जोडी पुन्हा एकदा 'हैदर' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'हैदर' हा सिनेमा विल्यम शेक्सपियरचे नाटकपासून प्रेरित आहे. 

शाहिद या सिनेमातून धमाकेदार एंट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'हैदर' या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाल कळेल की, हा सिनेमा त्याच्या इतर सिनेमापेक्षा वेगळ्या ताकदीचा सिनेमा असेल.

भारद्वाज यांनी विल्यम शेक्सपियरच्या नाटकापासून प्रेरित असलेला ओमकारा (ऑथॅलॉ)  आणि  मकबूल (मेकबेथ) सिनेमे बनविले होते. तसेच 'हेमलेट' या नाटकपासून प्रेरित असलेला 'हैदर' हा सिनेमा बनविला आहे. 'हैदर' या सिनेमाने भारद्वाज याची शेक्सपियर नाटकपासून बनविलेल्या सिनेमाची हॅट्रिक झाली आहे. या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी शाहिद यांच्याशिवाय दुसरा कोणताही अभिनेता त्यांच्या डोळ्यासोमर आला नाही. 'हैदर' हा सिनेमा  त्यांच्या बाकीच्या सिनेमा ऐवढाच यशस्वी आणि मनोरंजक असेल असे सांगितले जाते. 

तब्बू, के. के. मेनन, इरफान, शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर ही स्टार कास्ट या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाकडून सर्वांच्या खूप अपेक्षा असल्याचे सांगितले जाते.

'हैदर' या सिनेमातून काश्मीरचे विविध पैलू पाहायला मिळणार आहे. खूप वर्षानंतर बॉलिवूडमध्ये काश्मीर पार्श्वभूमीवर आधारित असलेला सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

विशाल भारद्वाज हा त्याच्या दिग्दर्शनाबरोबर त्याच्या संगीतकार म्हणून देखील ओळखला जातो. या सिनेमाला सुद्धा त्यांनी संगीत दिले असून ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी त्याच्या संगीताला शब्दबंध केले आहे. या सिनेमामुळे पुन्हा एकदा ही संगीत जोडी एकत्र  आली. या सिनेमातील गाण्यांमध्ये काश्मीरी टच देण्याचा त्याचा प्रयत्न दिसून येतो. भारद्वाज यांच्या सिनेमाबरोबर त्यांच्या गाण्याची देखील चर्चा सर्वत्र होत असते. तर त्यात 'हैदर' सिनेमा देखील याला अपवाद राहिला नाही.

2 ऑक्टोबरला 'हैदर' हा सिनेमा सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मग कशाची वाट बघताहेत  आताच जा! 'हैदर'  सिनेमाची तिकीट बुक करा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.