११ वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार गोविंदा-रवीनाची जोडी

गोविंदा आणि रवीना टंडनच्या फॅन्ससाठी खुशखबर आहे. दोघांची सुपरहिट जोडी तब्बल ११ वर्षानंतर पुन्हा पाहायला मिळणार आहे. या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. 

Updated: Mar 10, 2017, 10:21 AM IST
११ वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार गोविंदा-रवीनाची जोडी title=

मुंबई : गोविंदा आणि रवीना टंडनच्या फॅन्ससाठी खुशखबर आहे. दोघांची सुपरहिट जोडी तब्बल ११ वर्षानंतर पुन्हा पाहायला मिळणार आहे. या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. 

त्यानंतर आता पुन्हा हे दोघे एकत्र दिसणार आहे. एका अॅवॉर्ड शोदरम्यान हे दोघे परफॉर्मन्स करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रवीना झी सिने अॅवॉर्डदरम्यान कपूर अँड सन्समधील कर गई चुल या गाण्यावर डान्स करणार त्यानंतर ती आपल्या हिट गाण्यावर डान्स करणार आहे.

यादरम्यान दुल्हे राजा मधील अपने दीवानों का हे गाणं रिलीज होईल. ज्यानंतर गोविंदा स्टेजवर एंट्री घेईल. गोविंदा त्यानंतर रवीनासोबत या गाण्यावर थिरकेल.

तब्बल ११ वर्षानंतर हे दोघेही एकाच मंचावर एकत्र परफॉर्मन्स करताना दिसणार आहेत.