रणवीर - दीपिका ब्रेकअपच्या चर्चेनं फॅन्सना झटका

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिकाच्या ब्रेकअपच्या चर्चेनं फॅन्सना झटका बसला आहे. त्यामुळे यांच्या दुराव्याचं कारण जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

Updated: Oct 20, 2016, 01:40 PM IST
रणवीर - दीपिका ब्रेकअपच्या चर्चेनं फॅन्सना झटका title=

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिकाच्या ब्रेकअपच्या चर्चेनं फॅन्सना झटका बसला आहे. त्यामुळे यांच्या दुराव्याचं कारण जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
बेफिक्रे रणवीरला एक चिंता सतावतेय

दीपिका रणवीरची जोडी फॅन्समध्ये सुपरहिट आहे. मात्र सध्या या दोघांच्या ब्रेकअपची चर्चा आहे. दीपिकाला सध्या कोणतीच कमिटमेंट करण्याची इच्छा नाही आहे.

कारण सध्या दीपिकाचं करियर सातवे आसमांनपर आहे. त्यामुळेच कुठल्याही कार्यक्रमात दीपिकाचं नाव घेणारा रणवीर आता दीपिकाचं नाव घेण्याचं टाळतांना दिसतो. 

नुकतचं रणवीर पॅरिसमध्ये बेफिक्रेच्या ट्रेलर लॉंचसाठी गेलेला असतांना दीपिकावर विचारलेल्या प्रश्नाचं त्याने हटके उत्तर दिलं.

बेफिक्रेच्या ट्रेलरमधील रणवीरचा हॉट अंदाज बघून त्याच्या फिमेल फॅन्स अक्षरश: चक्रावल्या आहेत मात्र दीपिकाने या ट्रेलरवर रिएक्शन देण्याचं टाळलं आहे. 

दुसरीकडे दीपिकाच्या ट्रीपल एक्स THE RETURS OF XANDER CAGEच्या ट्रेलरचं रणवीर सोडून सगळ्यांनीच कौतुक केलयं. त्यामुळेच दोघांच्या नात्यावर आता प्रश्नचिन्ह उठू लागलये. मात्र प्रत्येक नात्यामध्ये रुसवा-फुगवा असते.

 हे सगळ्यांनाच माहितीये..त्यामुळे पद्मावतीच्या सेटवर जेव्हा रणवीर-दीपिका पुन्हा भेटतील तेव्हा त्यांच्यातील गैरसमज दूर होतील अशी आशा करायला हरकत नाही.