एका कार शोरुमजवळ किस करतांना दिसले रणवीर-दीपिका

मागील काही दिवसांपासून दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु होत्या. पण त्या फक्त अफवा असल्याचं आता समोर येतंय. कारण दोघांना किस करतांना पाहिलं गेलं आहे.

Updated: Nov 3, 2016, 04:52 PM IST
एका कार शोरुमजवळ किस करतांना दिसले रणवीर-दीपिका title=

मुंबई : मागील काही दिवसांपासून दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु होत्या. पण त्या फक्त अफवा असल्याचं आता समोर येतंय. कारण दोघांना किस करतांना पाहिलं गेलं आहे.

काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये खटकल्याचं बोललं जात होतं. पण एका मॅगझिनने दिलेल्या माहतीनुसार दोघांना एका कार शोरुमजवळ किस करतांना पाहिलं गेलं. सगळ्यांदेखत हे घडल्याने दोघेही चांगलेच चर्चेत आले आहे. या दोघांची केमेस्ट्री आधीपासूनच खूप चर्चेत आहे. 

दोघांमध्ये जेव्हा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत्या तेव्हा दीपिकाला या बाबत विचारण्यात आलं होतं पण तेव्हा तिने मला यावर काहीही नाही बोलू इच्छित असं तिने म्हटलं होतं. पण तिने म्हटलं होतं की, रणवीर हा तिच्या जीवनाचा एक भाग आहे आणि पुढेही राहिल. काही दिवसांपूर्वी तर चर्चा अशाही होत्या की, दोघांच्या कुटुंबियांनी दोघांचा साखरपुडा देखील केला आहे.