कतरिनानंतर रणबीर पुन्हा पडलाय प्रेमात

बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांत अशा काही घटना घडल्या की अनेक जण केवळ आश्चर्य व्यक्त करत पाहात राहिले... मुख्य म्हणजे, या घटना सेलिब्रिटिंच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत होत्या.

Updated: May 15, 2016, 03:52 PM IST
कतरिनानंतर रणबीर पुन्हा पडलाय प्रेमात title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांत अशा काही घटना घडल्या की अनेक जण केवळ आश्चर्य व्यक्त करत पाहात राहिले... मुख्य म्हणजे, या घटना सेलिब्रिटिंच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत होत्या.

कतरिना कैफशी ब्रेक अप झाल्यानंतर रणबीरचं नाव आता दिल्लीच्या मुलीशी जोडलं जातंय. 'टाईम्स'नं दिलेल्या बातमीनुसार, रणबीर एका दिल्लीला राहणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडलाय... या मुलीचं बॉलिवूडशी कोणतंही कनेक्शन नसल्याचं सांगितलं जातंय. 

आपलं हे अफेअर गुलदस्त्यातच राहावं, यासाठी रणबीर सर्वोतोपरी प्रयत्न करतोय. यामुळे मात्र, कतरिना आणि रणबीरच्या फॅन्सच्या मनातील, ही जोडी पुन्हा एकत्र येईल, अशी आशा आता धुळीला मिळालीय.